महायुती सरकारनं शेतकऱ्यांची कर्जमाफीचं वचन दिलं असून शेतकऱ्यांची कर्जमाफी योग्य वेळी होणार असल्याचा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. ते आज नांदेड जिल्ह्यात उमरी इथं पक्षाच्या मेळाव्यात बोलत होते. कर्जमाफीसाठी शासनानं समिती स्थापन केली आहे. या समितीकडून कर्जमाफी कशी करता येईल, याचा अभ्यास सुरू असल्याचंही ते यावेळी म्हणाले. आपल्या पक्षाची भूमिका ही सर्व जाती वर्गाला सामावून घेणारी असून, फुले, शाहू, आंबेडकरी विचारावरच वाटचाल करीत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. या मेळाव्याला माजी मंत्री नवाब मलिक, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
शेतकऱ्यांची कर्जमाफी योग्य वेळी होणार असल्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुनरुच्चार
By -
26.10.25
0
Tags:
