![]() |
अन्यायग्रस्त टोकरे कोळी जमातीच्या न्याय हक्कासाठी उपोषण:- संजय कांडेलकर आज उपोषणाचा पाचवा दिवस तहसीलदार, मनसे तालुकाध्यक्ष , समाज बांधवांची भेट. |
संदीप जोगी मुक्ताईनगर.......
२ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती, लालबहादूर शास्त्री जयंती या दिवसाचे अवचित्य साधून मुक्ताईनगर येथील संजय कांडेलकर यांनी कोळी समाजाला जातीचे दाखले मिळण्यासाठी शहरातील प्रवर्तन चौकामध्ये आमरण उपोषण ची सुरुवात केली. गेल्या कित्येक दिवसांमध्ये जातीने टोकरे कोळी, आदिवासी कोळी आदींचा उल्लेख असून सुद्धा भुसावळ विभागीय अधिकारी 1950 चा पुरावा सादर करावा अशी त्रुटी काढून दाखले रद्द करता ,दहा प्रकरण पैकी तीन प्रकरण निर्गमित केले जातात बाकीचे सात प्रकारचे रद्द केले जातात.
जीआर प्रमाणे नातेवाईकांचे शाळा सोडल्याचे दाखला किंवा रहिवासी पुरावा, महसूल पुरावा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष चौकशी अहवाल जन्माच्या नोंदी , अर्जदाराकडून अहवाल न मागवता त्यावर अन्यायाला वाचा फोडण्यासाठी संजय कांडेलकर यांचा प्रयत्न आहे जेणेकरून सर्व कोळी बांधवांना जातीचे दाखले अनुसूचित जमाती चे दाखले निर्गमित होण्यासाठी आम्हाला योग्य जन्माच्या नोंदी, आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखला, वडिलांचा शाळा सोडल्या चा दाखला इत्यादी पुरावे नसतील तर शपथपत्रावर लिहून दिल्या प्रमाणे नोंद दस्त योग्य आहे किंवा नाही सक्षम अधिकारी चौकशी करेल व गुणांवगुणांवरून दाव्याचा निर्णय देईल असा परिपत्रकात उल्लेख आहे तरी सदरील सर्व कोळी समाजाला जात प्रमाणपत्र दाखले निर्गमित होण्यासाठी हे आमरण उपोषण आहे. उपोषणाचा सोमवारी पाचवा दिवस असून तहसीलदार गिरीश वखारे यांनी भेट घेतलेली आहे. प्रसंगी मनसे तालुका अध्यक्ष मधुकर भोई , मनसे शहराध्यक्ष मंगेश कोळी, उपाध्यक्ष श्रीराम भोई , जयेश तायडे, पंकज कोळी, एच जी सपकाळे, सुनील कोळी ,विलास कोळी, तुकाराम कोळी उपस्थित होते.