![]() |
शिवसेना (उबाठा) च्या म.रा.वि्.वि कंपनी कार्यालयातच रहिवासी नागरिकासह आमरण उपोषणाच्या इशाऱ्याच्या धास्तीने वाकोडी ग्रामपंचायत हद्दीतील मुक्ताईनगर (दवंडे ले आऊट) मध्ये सिंगल फेज ची झाली थ्री फेज लाईन |
लवकरच जिल्हा नियोजन समिती (डी.पी.डी.सी) बसविली जाणार नवीन डी पी ....
मलकापुर:- वाकोडी ग्रामपंचायत हद्दीतील बुलढाणा रोडवरील मुक्ताईनगर (दवंडे लेआउट) मधील डी.पी.वर 63 चा ट्रांसफार्मर असून वाढती लोकसंख्या व इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरणे वाढल्याने वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने सायंकाळी चार वाजेपासून लोड कमी होत असल्याने घरातील उपकरणे जळाल्याने संतप्त रहिवासी नागरीकांनी शिवसेना (उबाठा) उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर यांचे नेतृत्वात कार्यकारी अभियंता राजेश मिश्रा यांना दि.10 जून 25 रोजी निवेदन देऊन या नगरासाठी नविन डि.पी ची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली होती अन्यथा लोकशाही मार्गाने आम्हाला रहिवासी नागरिकांसह महिलांनी म.रा.वि.वि कंपनी कार्यालयात आमरण उपोषण करावे लागेल असा इशारा शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर, शिवसेना शहरप्रमुख हरीदास गणबास, अल्पसंख्याक सेना उपजिल्हाप्रमुख शहर प्रमुख सै. वसीम सै. रहीम, सुनील अवचार, अमरसिंह राजपूत, संदीपसिंह चव्हाण, विकास वराडे,संजयसिंग राजपूत, अजयसिंह ठाकूर, प्रवीणसिंह राजपूत, चेतन पाटील, विठ्ठल पवार, पवन साखळकर, रमेश डहाके, ज्ञानदेव इंगळे, प्रमोद जुनारे,सौ.रमा शर्मा, योगेश शिराळ, विजयानंद पाटील, प्रवीण क्षिरसागर, रमेश वनारे, दिवाकर भुजबळ, विशाल क्षिरसागर, नंदकिशोर दीक्षित सह रहिवासी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे देण्यात दिला होता.शिवसेना (उबाठा) च्या आंदोलनाच्या इशाऱ्याच्या धास्तीने कार्यकारी अभियंता राजेश मिश्रा,आर.जी तायडे यांनी कर्मचाऱ्यांना दि .01 ऑक्टोबर बुधवार रोजी मुक्ताईनगरात पाठवून सिंगल फेज असलेल्या तारा काढून त्या थ्री फेज करून दिल्याने मुक्ताईनगर (दवंडे ले आऊट) मधील रहिवासी ग्रामस्थांचा "लो व्होल्टेज चा" तिढा सुटल्याने रहिवासी नागरीकांनी म.रा.वि.वि कंपनी व शिवसेना (उबाठा) उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर सह शिवसेना पदाधिकाऱ्यांचे मानले.लवकरच डि.पी.डी सी (जिल्हा नियोजन समिती)च्या मंजुराती नंतर मुक्ताईनगरातील रहिवासी नागरिकांसाठी नविन डि.पी बसवून प्रश्न कायमचाच मार्गी लागणार असल्याचे कार्यकारी अभियंता आर जी तायडे यांनी सांगितले.