नंदकुमार बगाडे पाटील अहिल्यानगर यांची माहिती
(अतिक. खान)
अहिल्यानगर जिल्ह्यातील सोनई गावात मातंग समाजातील तरुण संजय वैरागर याला गावातील काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी अमानुषपणे मारहाण करून त्याचे हातपाय मोडले, डोळे निकामी केले तसेच माणुसकीला काळीमा फासणारी घृणास्पद कृती म्हणजे त्याच्या शरीरावर लघवी करून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
या घटनेचा निषेध करत भारतीय लहुजी सेनेच्या वतीने दिनांक 24 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी बारा वाजता श्रीरामपूर येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले. या आंदोलनातून संजय वैरागरवर अत्याचार करणाऱ्या सर्व आरोपींवर तत्काळ अटक करून मकोका कायद्यान्वये कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून दलित आणि मागास समाजातील नागरिकांवर अत्याचाराच्या घटना वाढत असून, या घटनेतून प्रशासनाची कायदा व सुव्यवस्थेवरील पकड सैल झाल्याचे स्पष्ट दिसत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.
सदर आंदोलनात भारतीय लहुजी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल, राष्ट्रीय सचिव हनीफ भाई पठाण, जिल्हा संघटक राजेंद्र त्रिभुवन, जिल्हाध्यक्ष रज्जाक भाई शेख, तालुकाध्यक्ष अनिल रोकडे, महिला आघाडी तालुकाप्रमुख रोशन भाभी शेख, पत्रकार रमजान शेख, भगचंद नवगिरे, आकाश अडांगळे आदी मान्यवर उपस्थित होते.
आंदोलनादरम्यान प्रशासनाने तातडीने न्याय मिळावा आणि गुंडांविरुद्ध कठोरात कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी जोरदारपणे करण्यात आली

