![]() |
हमारा सिंदूर -हमारा देश मलकापुरात शिवसेना (उबाठा) कडून मोदी चा जाहीर निषेध |
भाजपा सरकार विरोधात प्रचंड नारेबाजी
मलकापुर:- पहलगाम हल्ल्यात निष्पाप लोकांचे बळी घेणाऱ्या पाकिस्तान देशासोबत येत्या १४ सप्टेंबर २०२५ भारत देश पाकिस्तान सोबत क्रिकेटचा सामना खेळून आमच्या भगिनीच्या सिंदूराचा अपमान करण्याचे काम करत आहे.
याचा तीव्र निषेध करण्यासाठी आज रविवार दि.14 सप्टेंबर रोजी सकाळी 11.०० वाजता तहसिल कार्यालयासमोर शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर, शिवसेना विधानसभा संघटक राजेशसिंह राजपूत, शिवसेना शहरप्रमुख हरीदास गणबास सह आदि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले.यावेळी दुटप्पी भूमिका घेणाऱ्या भाजपा पंतप्रधान नरेंद्र मोदी शासनाचा जाहिर निषेध करण्यात आला.भाजपा सरकार विरोधात प्रचंड नारेबाजी करण्यात आली.यावेळी शिवसेना उपशहरप्रमुख बाळू पोलाखरे, उपशहरप्रमुख शकील जमादार,युवा सेना तालुकाप्रमुख पवन गरुड, युवासेना शहरप्रमुख मंगेश सातव, वाहतूक सेना शहरप्रमुख इम्रान लकी, किसान सेना शहरप्रमुख सै.वसिम सै.रहिम, विभाग प्रमुख चांद चव्हाण, विभाग प्रमुख सत्तार शाह,शेख मोहसिन शेख छोटू,ज्ञानदेव पाटील, गजानन मेंहगे, वासुदेव भोगे,सागर पाटील, इक्बालभाई,अमोल नाफडे, रमेश चिम,सोहीलभाई, मुस्ताक पठाण,सह शिवसैनिकांची उपस्थिती होती.