![]() |
आखातवाडे – नगरदेवळा रस्ता पूरामुळे खराब; ग्रामस्थांनी केली तात्पुरती डांबरीकरणाची सोय |
(अतिक खान, मुक्ताईनगर)
गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीला आलेल्या पुराच्या पाण्याने आखातवाडे ते नगरदेवळा या मुख्य रस्त्याचे मोठे नुकसान केले आहे. रस्त्यावरील डांबर वाहून गेले असून ठिकठिकाणी मोठे खड्डे निर्माण झाल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. यामुळे ग्रामस्थांना रोजच्या प्रवासात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे तातडीने या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मागणी केली आहे. संबंधित कंत्राटदाराला आदेश देऊन त्वरित कामकाज सुरू करावे, अशीही अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, गावातील अपरोज खान, समीर शेख, नवाज शेख, सर्पराज शहा, रिहान खान, जुबेर शेख व परवेश शेख या युवकांनी एकत्र येऊन दगड व उखडलेले डांबर स्वतः उचलून रस्त्याची तात्पुरती सोय करून वाहतुकीस मार्ग मोकळा केला.
ग्रामस्थांच्या या पुढाकारामुळे सध्या वाहनचालकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असून, लवकरच प्रशासनाकडून पक्क्या दुरुस्तीस सुरुवात व्हावी, अशी अपेक्षा आहे.