पुणे पदवीधर निवडणूक : भाजपकडून राजेश पांडे यांची
‘मतदार नोंदणी प्रमुख’ म्हणून नियुक्ती |
पुढील वर्षी होणाऱ्या विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी भाजपकडून प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांची ‘मतदार नोंदणी प्रमुख’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांनी नियुक्तीपत्र प्रदान केले. याचबरोबर आमदार संजय केनेकर यांची छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघासाठी, तर प्रदेश विशेष निमंत्रित सदस्य सुधाकर कोहळे यांची नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी ‘मतदार नोंदणी प्रमुख’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे