![]() |
पीकविमा, कर्जमुक्तीच्या प्रश्नावर रविकांत तुपकर आक्रमक 'क्रांतिकारी शेतकरी संघटना ही आंदोलनाचा वणवा पेटवणार ! |
मलकापूर – बळीराजाच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या अनेक मागण्यांसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली आज, शनिवारी मलकापूर येथे उपविभागीय अधिकारी (महसूल) यांच्या कार्यालयावर शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने बळीराजा हा सहभागी झाला होता . बळीराजाचा थकलेला पीकविमा हा १०० % टक्के मिळालाच पाहिजे , व बळीराजाला कर्जमुक्ती मिळालीच पाहिजे, तसेच मलकापूर तालुक्यातील विवरा गावातील सोलर कंपनीने बळीराजाच्या रस्त्यावर केलेले अतिक्रमण काढून रस्ता मोकळा करून देण्यात यावा, आणि ज्वारीची खरेदी सुरू करावी, तसेच कापूस आणि सोयाबीनच्या आयात-निर्यात धोरणात बदल करण्यात यावा , आणि बळीराजासारखे शेतमजुरांना विमा सुरक्षा मिळालीच् पाहिजे, व बळीराजाला जंगली जनावरांचा होणारा त्रास यासाठी अनेक मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला.
मोर्चाला संबोधित करताना बळीराजाचे नेते रविकांत तुपकर यांनी सरकार आणि प्रशासनावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, बळीराजाची ही लढाई दुसऱ्या स्वातंत्र्याची लढाई आहे. सरकारने कापसावरील आयात शुल्क हटवल्याने कापसाचे भाव कमी होण्याची भीती आहे. त्यामुळे सरकारने तातडीने आयात-निर्यात धोरणात बदल करावा. तसेच, सोयाबीनची सोयापेंड निर्यात करावी, जेणेकरून शेतकऱ्यांना सोयाबीनला जास्त भाव मिळण्यास मदत होईल.' तुपकर यांनी पुढे सांगितले की, आज मलकापुरात सुरू झालेला हा मोर्चा एका वणव्यासारखा संपूर्ण महाराष्ट्र भर पेटून उठेल कारण शासनाने 'निवडणुकीपूर्वी बळीराजाला कर्जमाफीचे दिलेले आश्वासन पूर्ण करावे. पीकविमा कंपन्यांनी अधिक विलंब न करता बळीराजाला थकित पीकविमा तात्काळ अदा करावा परंतु आम्ही सध्या आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहोत, परंतु शासनाने उशीर केल तर आम्हाला आक्रमक आंदोलनही करता येईल,' असा इशारा त्यांनी दिला. मोर्चाच्या आयोजनाची जबाबदारी अमोल राऊत आणि सचिन शिंगोटे यांनी पार पाडली. यावेळी सचिन पांडुळे, दामोदर शर्मा, गजानन भोपळे, विश्वास पाटील, प्रवीण पाटील, रणजीत डोसे, हर्षल मोरे, गोपाल रायपुरे, भागवत अढाव, विलास इंगळे, सुरज कोलते, गजानन नाईकवाडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. हा मोर्चा बळीराजांचे एकजुटीचे आणि त्यांच्या हक्काच्या लढ्याचे प्रतिक ठरला असून, येत्या काळात या आंदोलनाचा वणवा राज्यभर पसरण्याची शक्यता तुपकर यांनी व्यक्त केली आहे.
बळीराजाचा थकित पीकविमा तात्काळ अदा करण्यात यावा पीकविमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना थकित रक्कम तातडीने द्यावी.
शेतकरी कर्जमुक्तीः सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेले कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करावे.
- सोलर कंपनीचे अतिक्रमण हटवावेः विवरा गावातील सोलर कंपनीने अतिक्रमण केलेला रस्ता मोकळा करावा.
ज्वारी खरेदी सुरू व्हावीः बळीराजाच्या ज्वारीची खरेदी तात्काळ सुरू करण्यात यावी
आयात-निर्यात धोरणात बदलः कापसावरील आयात शुल्क पुन्हा लागू करावे आणि सोयाबीन डीओसी, सोयापेंड निर्यातीला परवानगी द्यावी.
या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने बळीराजांनी आपला सहभाग
या मोर्चा मध्ये दाखवला मलकापूर तालुक्यासह आजूबाजूच्या परिसरातील बळीराजा हा मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. बळीराजाने तहसील कार्यालय पायी मोर्चा काढण्यात येऊन आपला रोष व्यक्त केला. शांततेत काढण्यात आलेल्या या मोर्चाने प्रशासनाला बळीराजाच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली आहे. रविकांत तुपकर यांनी प्रशासनाला उद्देशून सांगितले की, बळीराजाला न्याय देण्यासाठी प्रशासनाने तात्काळ पावले उचलावीत. आम्ही शांततेच्या मार्गाने लढत आहोत, पण
गरज पडल्यास आम्ही आंदोलन अधिक तीव्र स्वरूपाचा करू. असे त्यांनी यावेळी म्हटले