आमदार सिद्धार्थ खरात यांची संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सिनेट सदस्यपदी नियुक्ती

Viral News Live Buldhana
By -
0

आमदार सिद्धार्थ खरात यांची संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सिनेट सदस्यपदी नियुक्ती

मेहकर दि २९ – मेहकर चे आमदार सिद्धार्थ खरात यांची संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती या विद्यापीठाच्या सिनेट सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
      महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०२० मधील नियम २८(१)(w) अन्वये दोन विधानसभा सदस्यांना सिनेटवर नियुक्त करण्याचा अधिकार विधानसभेचे अध्यक्ष यांना आहे. त्यानुसार विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी आमदार सिद्धार्थ खरात यांची नियुक्ती संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती या विद्यापीठाच्या सिनेटवर केली आहे.
    विशेष म्हणजे आमदार सिद्धार्थ खरात हे मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण विभागात सहसचिव म्हणून कार्यरत असताना सन २०१५-१६ मध्ये पारीत झालेल्या महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ च्या निर्मितीत त्यांचा महत्वाचा सहभाग राहिला आहे. या अधिनियमात विद्यापीठ कार्यक्षेत्रांतर्गत शिक्षण, उच्च शिक्षण, कौशल्य विकास शिक्षण, रोजगाराभिमुख शिक्षण इत्यादी संबंधी विस्तृत तरतुदी करण्यात आल्या आहेत.
    प्रत्यक्ष कायदा करणारा अधिकारी आमदार होऊन विद्यापीठ सिनेटवर आल्याने शिक्षण क्षेत्रात होणाऱ्या बदलाकडे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. आमदार सिद्धार्थ खरात यांच्या नियुक्तीमुळे त्यांचे विविध स्तरातून स्वागत करण्यात येत आहे.

Post a Comment

0Comments

Please Select Embedded Mode To show the Comment System.*