सुप्रिया सुळे यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट |
मुंबई, आझाद मैदान, 31 ऑगस्ट –
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषणाला आज नवा राजकीय रंग मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आझाद मैदानावर जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी जरांगे पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि आंदोलनाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.
पत्रकारांशी बोलताना सुळे म्हणाल्या की, “मराठा समाजाच्या मागण्या रास्त आहेत. या प्रश्नावर सरकारने केवळ चर्चा न करता ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे. तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलवावी, विधानसभेचं अधिवेशन घेऊन या विषयावर चर्चा करून मार्ग काढावा.”
याशिवाय त्यांनी आंदोलन स्थळावरील अडचणींवरही सरकारचे लक्ष वेधले. “आझाद मैदान परिसरात विजेची योग्य व्यवस्था व्हावी, शौचालयांची स्वच्छता राखली जावी,” अशी मागणीही सुळे यांनी केली.