बुलढाणा : ग्रामीण भागातही बीएसएनएल ची मोबाईल, इंटरनेट सेवा ग्राहकांना उत्तमरीत्या मिळावी या दृष्टिकोनातून केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी मागणी केलेले नविन ४२ टॉवरची सेवा कार्यन्वीत झाली आहे. त्यामुळे नागरीकांना बीएसएनएलची नेटवर्क सेवा चांगल्या दर्जाची मिळणार आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामीण भागात भारतीय दूरसंचार निगम अर्थात बीएसएनएल ची सेवा मिळत नाही. अशा तक्रारी ग्रामीण भागातून केंद्रीयमंत्री तथा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. यासंदर्भात दूरसंचार विभागाशी पत्र व्यवहार करून सूचित करण्यात आले होते. बीएसएनएल ची इंटरनेट व मोबाईल सेवा सुधारण्याच्या दृष्टिकोनातून नवीन टॉवर उभारण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार नवीन टॉवरचा प्रस्ताव तयार करून तो संबंधित विभागाला पाठवल्यानंतर त्याचा पाठपुरावा खासदार प्रतापराव जाधव यांच्या कार्यालयाच्या वतीने करण्यात आला होता. त्याच्या पाठपुराव्याला यश आले असून बुलढाणा जिल्ह्यात आता नव्याने ४४ टॉवर ग्रामीण भागामध्ये उभारल्या गेले आहे. त्यापैकी ४२ टॉवरवरून आजपासून सेवा कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातही आता बीएसएनएलची चांगल्या दर्जाची सेवा ग्राहकांना मिळणार आहे.
बुलढाणा तालुक्यातील अटकळ, मातला, बोरखेड तर चिखली तालुक्यातील बोराळा, मेडशिंग या टॉवरचे काम प्रगतीपथावर तर घुमा, भोरसा भोरसी, टावर वरून सेवा कार्यान्वित दहिगांव, पिंपरखेड, मेहकर तालुक्यातील वाघदेव, मेळजानोरी, मुंदेफळ, मादणी, मोताळा तालुक्यातील चिंचपुर, हनवतखेड, खडकी, खंडवा, नळकुंड, लोणार तालुक्यातील कासारी, सिंदखेड राजा तालुक्यातील गुंज, आडगांव राजा, खामगांव तालुक्यातील पिंप्री कोरडे, वडजी, श्रीधर नगर, नागझरी खु., नांद्री, कदमापुर, शेगांव तालुक्यातील घुई हिंगणा, जळगांव जामोद तालुक्यातील काजेगांव, दादुलगांव, मांडवा, सोनबर्डी, गारपेठ, करमोडा, संग्रामपुर तालुक्यातील रोहीण खिडकी नविन, आवार, वडगांव, आसवंत, मलकापुर तालुक्यातील अनुराबाद, हरसोडा, नांदुरा तालुक्यातील वळती, काटी, गोशिंग येथे बीएसएनएलचे टॉवर उभारल्या गेले आहेत. या टावर वरून सेवाही कार्यान्वित करण्यात आली आहे. या टॉवरमुळे इंटरनेट आणि मोबाईलची बीएसएनएल सेवा सुधारून नेटवर्कही ग्राहकांना उपलब्ध होणार आहे.
दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी मानले आभार
केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामीण भागात बीएसएनएल ची सेवा सुधारण्याच्या दृष्टिकोनातून नवीन टॉवरची मागणी केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत बुलढाणा जिल्ह्यात नवीन ४४ टॉवर मंजूर करून त्यातील ४२ टॉवर वरून तत्पर सेवा कार्यान्वित करून दिल्याबद्दल नामदार प्रतापराव जाधव यांनी आभार मानले.