शिक्षकांच्या उत्कृष्ट कामगिरीचा सन्मान
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी : - बुलढाणा जिल्हा परिषद बुलढाणा आणि ओपन लिंक फाउंडेशन यांच्यातील सामंजस्य करार अंतर्गत राबविण्यात येणारा आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्यक कार्यक्रम अर्थात विनोबा(बा) ॲपच्या माध्यमातून जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षकांना प्रत्येक महिन्यात प्रोत्साहनपर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.जुलै - ऑगस्ट महिन्यात मलकापूर तालुक्या मधून ग्राम हिंगणा काजी येथे कार्यरत असलेल्या सौ. सुनीता सुरेश सैंदाणे या शिक्षिके सह सुरेश सैंदाणे सर, विनोद क्षीरसागर सर आणि फयाज अहमद सर या शिक्षकांना बुलढाणा जिल्हा स्तरावरील पोस्ट ऑफ द मंथ या पुरस्काराचे मानकरी ठरले असून त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
सदर पुरस्कार मा. शिक्षण अधिकारी विकास पाटील साहेब , मा.देवकर साहेब उपशिक्षणाधिकारी ,विनोबा टिमचे जिल्हा समन्वयक नजीर शेख सर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
साहेबांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या व सर्व शिक्षकांना प्रेरणा द्यावी अशा प्रकारे अपेक्षा व्यक्त केले