बुलढाणा जिल्हा पोलीस दलातील 5 अधिकारी व अंमलदारांचा सत्कार समारंभ

Viral news live
By -
0
बुलढाणा जिल्हा पोलीस दलातील 5 अधिकारी व अंमलदारांचा सत्कार समारंभ

बुलढाणा जिल्हा पोलीस दलातील 5 अधिकारी व अंमलदारांचा सत्कार समारंभ


बुलढाणा, दि. 30 ऑगस्ट 2025 – बुलढाणा जिल्हा पोलीस दलातील पाच पोलीस अधिकारी व अंमलदार हे नियत वयोमानाने आज सेवानिवृत्त झाले. यानिमित्ताने पोलीस अधिक्षक कार्यालय, बुलढाणा येथे मा. श्री. निलेश तांबे, भा.पो.से., पोलीस अधिक्षक बुलढाणा यांच्या उपस्थितीत निरोप व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले.

सेवानिवृत्त झालेल्यांमध्ये –

  1. जीपीएसआय सुभाष पुंडलिक शिंदे (ब.न. 927), नियंत्रण कक्ष बुलढाणा
  2. सफो गजानन बळीराम सातव (ब.न. 54), पो.स्टे. पिपळगांव राजा
  3. सफी गजानन रतन तरमळे (ब.न. 259), पो.स्टे. चिखली
  4. सफो कैलास गोबरा चव्हाण (ब.न. 1638), खामगाव ग्रामीण
  5. पोहेकों मधुकर धुमा चव्हाण (ब.न. 1397), शिवाजी नगर

सत्कार समारंभात निवृत्त अधिकारी व अंमलदार यांचा कुटुंबीयांसह शाल, श्रीफळ, पुष्पहार, सेवानिवृत्ती प्रमाणपत्र, मोमेंटो, झाडांचे रोपटे व भेटवस्तु देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमास मा. श्री. अमोल गायकवाड, अपर पोलीस अधिक्षक बुलढाणा यांच्यासह पो.नि. बी.डी. पावरा, पो.नि. सुनिल अंबुलकर, पो.नि. काकविपुरे, पो.नि. विजय हुडेकर, सहाय्यक पो.उपनिरीक्षक श्रीवास्तव, मपोहेकों ज्योती राठोड, मपोकों रेखा बकाल आदी अधिकारी उपस्थित होते.

सत्कार सोहळ्यात एकूण 40 कुटुंबीय व नातेवाईक सहभागी झाले होते. कार्यक्रमानंतर अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले.

Tags:

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Accept !