उदयपूर फाईल्स’ चित्रपटावर तात्काळ बंदी घालावी – मुस्लिम समाजाची राज्यपालांकडे मागणी

Viral news live
By -
0

उदयपूर फाईल्स’ चित्रपटावर तात्काळ बंदी घालावी – मुस्लिम समाजाची राज्यपालांकडे मागणी

मलकापूर (दि. ८ जुलै २०२५): मलकापूर शहरातील मुस्लिम समाजाने आज उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्याकडे निवेदन सादर करत ‘उदयपूर फाईल्स’ या चित्रपटावर आणि त्याच्या प्रदर्शनावर तात्काळ बंदी घालण्याची जोरदार मागणी केली. या निवेदनात असे नमूद करण्यात आले की, सदर चित्रपटात इस्लाम धर्माचे अंतिम संदेष्टा हजरत मोहम्मद (सल्ल.) आणि उम्मुल मोमिनीन हजरत आयशा (र.अ.) यांच्याविषयी अपमानास्पद, अश्लील आणि आक्षेपार्ह दृश्ये व संवाद दाखवण्यात आले आहेत.

या चित्रपटामुळे मुस्लीम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असून, समाजात दुही पसरू शकते, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या चित्रपटावर त्वरित बंदी घालून चित्रपट निर्माते व दिग्दर्शकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

या वेळी मलकापूर शहरातील विविध धार्मिक, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच सर्व पक्षांचे नेते, समाजसेवक आणि मुस्लिम समुदायातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवेदन देताना मौलवी अब्दुल्ला, मौलाना ग़ुलाम गौस नूरी, मौलाना तारिक, माजी नगराध्यक्ष अॅड. अब्दुल मजीद कुरेशी, अॅड. शाहिद शेख, शहजाद खान, अॅड. स्नेहल तायडे, अतीक सेठ (जवारीवाले), साजिद मोहम्मद खान, दानिश शेख, इजाज शाह, नासिर खान, रईस खान जमादार, इम्रान खान मौलाना, शोएब अहमद लाला, सैयद वसीम, इम्रान लकी, अज़ीम कुरेशी, मुशर्रफ पठाण, शेख तन्वीर (इलेक्ट्रीशियन), अशरफ शेख, सलीम खान, तौफिक लीडर, अब्दुल रहमान, जाफर खान, रईसभाई चांदोर, मोहम्मद फैज़, इम्रान, शेख अब्दुल अज़ीझ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

समाजाच्या धार्मिक भावना जपण्यासाठी, तसेच सामाजिक सलोखा अबाधित ठेवण्यासाठी शासनाने तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी समाजातून जोर धरत आहे.

Tags:

Post a Comment

0Comments

Please Select Embedded Mode To show the Comment System.*