सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा यशस्वी विजय : मागण्या मान्य, प्रशासनाचे लेखी आश्वासन मिळाले

Viral news live
By -
0

 

सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा यशस्वी विजय : मागण्या मान्य, प्रशासनाचे लेखी आश्वासन मिळाले

जळगाव जामोद (प्रतिनिधी)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वस्तीगृहाचा रस्ता डांबरीकरण करावा व हायमास्ट लाईट बसवावी या मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन बुलढाणा जिल्ह्याच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष मोहित दामोदर यांनी 30 जूनपासून आमरण उपोषण सुरू केले होते.

मागील वर्षभर सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही काहीही कार्यवाही न झाल्याने विद्यार्थ्यांना अखेर हे टोकाचे पाऊल उचलावे लागले. आंदोलनाच्या दुसऱ्याच दिवशी, 1 जुलै रोजी प्रशासनाने या प्रश्नाची तातडीने दखल घेतली आणि मा. तहसीलदार जळगाव जामोद यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनकर्त्यांना लेखी आश्वासन देण्यात आले.

या लेखी आश्वासना अनुसार, दीड महिन्याच्या आत रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण करण्यात येईल आणि तत्काळ पर्यायी व्यवस्था म्हणून खडी टाकून कच्चा रस्ता तयार केला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले. त्यानंतर आमरण उपोषणाची यशस्वी सांगता करण्यात आली.


या वेळी उपस्थित मान्यवर व कार्यकर्ते:

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे उत्तर जिल्हाध्यक्ष देवाभाऊ हिवराळे, दक्षिण जिल्हाध्यक्ष निलेशभाऊ जाधव, फुले-आंबेडकर विद्वत सभेचे राज्य समन्वयक प्रा. मनोजजी निकाळजे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा विशाखाताई सांवग, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष अनिल वाकोडे, बौद्ध महासभा महिला जिल्हाध्यक्षा छायाताई बांगर, जिल्हा समन्वयक प्रा. दिलीप कोकाटे, ॲड. रागिणीताई तायडेमंगलाताई पारवेगौतम इंगळेगिरीश उमाळे, नांदुरा तालुकाध्यक्ष आजाबराव वाघोदे, तालुकाध्यक्ष जगदिश हातेकरगौतम सुरवाडे, माजी तालुकाध्यक्ष संतोष गवई, बाजार समिती उपसभापती प्रशांत अवसरमोलरतन नाईकसुनील बोदडेदेवा दामोदरविजय सातवसंतोष पवारराजरत्न वाकोडेरोशन तायडेरविंद्र वानखडेदिलीप दामोदरविजय दामोदरप्रशांत नाईकविकी दामोदरचेतन तायडेभास्कर जुबंळेसुभाष सिरसाठसुरेश वाघोदेमयुर खंडेरावआदित्य खंडेराव आणि वंचित बहुजन आघाडी, महिला आघाडी, युवा आघाडी, भारतीय बौद्ध महासभा, फुले आंबेडकर विद्वत सभा, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे कार्यकर्ते व असंख्य विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0Comments

Please Select Embedded Mode To show the Comment System.*