शेतकऱ्यां प्रती संवेदनहिन असणाऱ्या कृषी मंत्री कोकाटे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा अन्यथा उपविभागीय अधिकारी कार्यालयातच रमी पत्ते खेळण्याचा शिवसेना (उबाठा) इशारा

Viral news live
By -
0
शेतकऱ्यां प्रती संवेदनहिन असणाऱ्या कृषी मंत्री कोकाटे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा अन्यथा उपविभागीय अधिकारी कार्यालयातच रमी पत्ते खेळण्याचा शिवसेना (उबाठा) इशारा

मलकापुर:- निवडणुकीदरम्यान शेतकऱ्यांना संपूर्ण सातबारा कोरा करण्याचे आश्वासन देणाऱ्या महायुती सरकारचे मंत्री, खासदार,आमदार हे शेतकऱ्यांची थट्टा करत असून सरकार शेतकऱ्यांच्या प्रती संवेदनहिन असून महाराष्ट्रात दररोज आठ शेतकरी आत्महत्या करीत आहे त्यांकडे लक्ष न देता विधानभवनात कृषीमंत्री कोकाटे मोबाईलवर रमी गेम खेळण्यात मग्न आहे. अशा कृषी मंत्र्याचा व महायुती सरकारचा शिवसेना उबाठा जाहीर निषेध करत असून शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती करा व कृषीमंत्र्याची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करण्याची मागणी  मुख्यमंत्री यांना उपविभागीय अधिकारी मार्फत निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे.कोकाटे ची  मंत्रीमंडळातून तात्काळ हकालपट्टी करून शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी अन्यथा उपविभागीय अधिकारी कार्यालयातच पत्त्याचा रमी गेम खेळणार असल्याचा इशारा शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर सह शिवसेना पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनावर शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर,विधानसभा संघटक राजेशसिंह राजपूत, शिवसेना शहरप्रमुख हरीदास गणबास, कामगारसेना तालुकाप्रमुख राम थोरबोले, किसानसेना तालुकाप्रमुख महादेव पवार, युवा सेना तालुकाप्रमुख पवन गरुड, किसानसेना शहरप्रमुख सै. वसीम सै.रहीम,वाहतूकसेना शहरप्रमुख इम्रान लकी, कामगार सेना शहरप्रमुख संतोष बोरले,शिवसेना उपशहरप्रमुख बाळू पोलाखरे, उपशहर प्रमुख शकील जमादार, माजी नगरसेवक पांडुरंग चिम, किशोर राऊत,मंगेश सातव,आकाश बोरले, बुढन पहेलवान सह शिवसेना पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

Tags:

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Accept !