च्या निमित्ताने पारंपरिक रितीरिवाजानुसार मातमी कार्यक्रम आयोजित केले जातात. त्याच पार्श्वभूमीवर यावर्षी देखील रविवारी मोहरमची १०वी तारीख असून, इराणी समाजाकडून मातमी मिरवणूक काढण्यात येणार आहे.
दरवर्षी अकोला महानगरपालिकेच्यावतीने इमामबाडा मार्गावर मुरूम टाकून रस्ता समतल केला जातो, जेणेकरून मातम करणाऱ्या भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये. मात्र यावर्षी अद्यापपर्यंत रस्त्यावर मुरूम टाकण्यात आलेले नाही. त्यामुळे समाजात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
या संदर्भात जन सत्याग्रह संघटनेच्यावतीने अकोला मनपा उपायुक्तांना निवेदन देण्यात आले. मोहरमपूर्वी लवकरात लवकर लक्ष्मी कॉलनी इमामबाडा मार्गावर मुरूम टाकण्याची मागणी संघटनेकडून करण्यात आली, जेणेकरून भाविकांना कोणतीही गैरसोय होणार नाही.
यावेळी उपायुक्तांनी प्रतिनिधी मंडळाला आश्वासन दिले की संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून लवकरात लवकर मुरूम टाकण्याचा प्रयत्न केला जाईल.
निवेदन देणाऱ्यांमध्ये आसिफ अहमद खान, जावेद पठाण, मोहम्मद फिरोज, मोहम्मद मोहसिन, शहजाद रब्बानी, शेख आसिफ, अंजार खान आदींचा समावेश होता