मुंबई : अतिक खान.. जळगाव
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.ना. श्री. अजितदादा पवार यांची महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी सलग चौथ्यांदा बिनविरोध निवड झाल्याने राज्यभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अजितदादांच्या नेतृत्वाखाली गेल्या १२ वर्षांत महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्राने उल्लेखनीय प्रगती साधली असून, त्यांच्या पुनर्निवडीमुळे क्रीडा विश्वात नवचैतन्य निर्माण झाले आहे.
२०१३ पासून अजितदादा महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कार्यकाळात राज्यातील अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तुंग यश संपादन केले आहे. खेळाडूंना आवश्यक सुविधा, प्रोत्साहन आणि व्यावहारिक धोरणांची अंमलबजावणी करून त्यांनी राज्यातील क्रीडा संस्कृतीला नवा उन्मेश दिला आहे.
अजितदादांच्या क्रीडाप्रेमी वृत्तीमुळे महाराष्ट्रातील अनेक तरुण खेळाडूंना प्रेरणा मिळाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याने विविध क्रीडा स्पर्धांमध्ये विक्रमी पदकसंख्या मिळवली असून, महाराष्ट्र आज देशातील आघाडीचे क्रीडा राज्य म्हणून ओळखले जाते.
राज्यभरातील क्रीडा संघटनांनी आणि खेळाडूंनी अजितदादांच्या पुनर्निवडीचे स्वागत करत, “अजितदादांचे नेतृत्व म्हणजे क्रीडा प्रगतीची हमी” अशा शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.
क्रीडा क्षेत्रातील त्यांच्या सातत्यपूर्ण योगदानामुळे आणि खेळाडूंविषयीच्या जिव्हाळ्यामुळेच ही जबाबदारी पुन्हा एकदा त्यांच्या खांद्यावर आली आहे. आगामी काळात त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली राज्याच्या क्रीडा क्षेत्राला नवी उभारी मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
अजितदादा पवार यांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा व त्रिवार अभिनंदन!
असिफ शेख बागवान मुक्ताईनगर

