मोताळा तालुक्यात  अचानक आलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या आयुष्यातील 'पांढरे सोने' म्हणजे कापूस पाण्यात बुडवले आहे.
पहलेच अतिवृष्टी व आता परतीच्या पावसामुळे वेचणीसाठी तयार असलेल्या पिकाला अतिवृष्टीचा तडाखा बसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. वेचणीचे दर ३० टक्क्यांनी वाढले, मजुरांचा खर्च दुप्पट झाला, कापसाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने आणि शेतमजुरी वाढल्याने शेतकऱ्यांची चिंता गगनाला भिडली आहे. हवामान विभागाने पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने संकट आणखी गडद झाले आहे.कापूस भिजला, स्वप्ने भंगली   पाऊस मागील ३ ते ४ दिवसापासून थांबण्याचे नाव घेत नाही. कापूस वेचणीसाठी तयार असतानाच बोंडे भिजली. शेतकरी  प्राथमिक अंदाजानुसार, ४५-६० टक्के कापूस खराब झाला असून, उरलेल्या पिकाचा दर्जा घसरल्याने बाजारात कापसाला कमी भाव मिळत आहे  "वेचणीचे दर १० रुपये किलो आणि ५००-६०० रुपये, दिवसाची मजुरी काही ठिकाणी सतत पाऊस चालू असल्यामुळे  मजूर म्हणतात 'पावसात काम नाही'पावसामुळे मजुरांची टंचाई भासत असून, कापूस वेचणीचे दर ३०-४० टक्क्यांनी वाढले आहेत. पूर्वी ३५०-४००रुपये दिवसाला मिळणारी मजुरी आता ५००-६०० रुपये झाली आहे. " परिणामी, अनेक शेतकरी स्वतः कुटुंबासह शेतात उतरले आहेत, पण पाऊस थांबत नाही. 
व कापसाला अपेक्षित बाजारभाव सुद्धा मिळत नाही
साधारण कापसाला आज रोजी ६३०० ते ७००० रुपये प्रति क्विंटल पर्यंत भाव मिळत आहे   बाजारात ७,००० रुपये मिळाले. गेल्या आठवड्यात ७,४०० पर्यंत भाव होते, पण पावसामुळे घसरण झाली. व्यापारी म्हणतात, "भिजलेला कापूस कुणी घेणार? दर्जा खराब, मागणी कमी." झाली    बाजारात ६,५०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांना भाव मिळत नाही. सरकार खरेदी केंद्र का उघडत नाही?"सोयाबीनचे दर वाढले, पण उत्पादन घटले सोयाबीनला दिलासा मिळाला आहे. आज सरासरी ४,०००-४,३५० रुपये प्रति क्विंटल भाव मिळत असून, स्थानिक मंडित ४,३५० पर्यंत पोहोचले. गेल्या महिन्याच्या तुलनेत १०-१५ टक्के वाढ झाली. मात्र, पावसामुळे सोयाबीनचे पीक ३५-५० टक्के बाधित झाल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. एक शेतकरी म्हणाला, "भाव चांगले, पण धान्यच नाही. काय उपयोग करपणे मळणे व वाहतूक खर्च खूप वाढलेले असून मिळणारे उत्पन्न कमी आहे त्यामुळे यंदा शेतकरी हा तोट्यात आहे   त्यामुळे अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले आले आहेत.  लहान शेतकऱ्यांना कर्ज फेडणे अशक्य होत आहे.सरकारची मदत अपुरी, शेतकरी रस्त्यावर?राज्य सरकारने अतिवृष्टी नुकसान भरपाई जाहीर केली असली तरी पाहणी आणि अर्ज प्रक्रिया रखडली आहे."शेतकरी हतबल  आहेत. सरकार झोपले आहे सरकारने शेतकऱ्यांच्या मालासाठी तात्काळ खरेदी केंद्रे, सुरू करावीत लवकरात लवकर कर्जमाफी करावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे मागणी केली आहे.


