उपेक्षित मायक्रो ओबीसी यांना स्वतंत्र राजकीय आरक्षण देण्याची ओबीसी जनकल्याण संघाची मागणी

Viral news live
By -
0
उपेक्षित मायक्रो ओबीसी यांना स्वतंत्र राजकीय आरक्षण देण्याची ओबीसी जनकल्याण संघाची मागणी
उपेक्षित मायक्रो ओबीसी यांना स्वतंत्र राजकीय आरक्षण देण्याची ओबीसी जनकल्याण संघाची मागणी

जळगाव..(अतिक खान) महाराष्ट्र मध्ये मंडल आयोगाच्या पूर्ण शिफारशी लागू करून ओबीसी मधील छोट्या छोट्या जातींना आजपर्यंत कोणताच राजकीय सामाजिक आणि नोकरी आणि शैक्षणिक दृष्ट्या लाभ मिळालेला नसून छोट्या छोट्या जातींना अद्याप जातीचे दाखले सुद्धा मिळालेले नाहीत त्यासाठी राजकीय सामाजिक दृष्ट्या उपेक्षित अशा ओबीसी कारागीर मजदूर भूमिहीन मायक्रो जातीना स्वतंत्र आरक्षण देण्याची मागणी ओबीसी जनकल्याण संघाचे प्रदेश अध्यक्ष श्री प्रशांत बोरकर यांनी केंद्र व राज्य शासनाकडे केली आहे.


देशाला स्वातंत्र्य ७८ वर्षांपूर्वी मिळाले असले तरी ओबीसी मधील हजारो जाती आजही स्वातंत्र्याची फळे मिळण्यासाठी वंचित असून असंख्य जाती ह्या साधे ग्रामपंचायत सदस्य नगरसेवक म्हणून निवडून येऊ शकत नाहीत अशी परिस्थिती असून त्यामुळे हुशार सक्रिय सामाजिक तळमळ असणाऱ्या कार्यकर्ते यांना ते छोट्या जातीची आहे म्हणून त्यांना आज पर्यंत संधी मिळत नाही त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये खाजगी कंपन्या सहकारी शैक्षणिक संस्था तसेच विधानसभा लोकसभा मध्ये विधानपरिषद मध्ये मायक्रो छोट्या ओबीसी जातींना स्वतंत्र राजकीय सामाजिक आरक्षण देण्याची मागणी ओबीसी जनकल्याण संघाचे प्रदेश अध्यक्ष श्री प्रशांत बोरकर यांनी केली आहे.

लोकशाहीमध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना संधी मिळाली पाहिजे त्या दृष्टीने ओबीसींच्या छोट्या छोट्या जाती यांनी सध्याच्या सत्ताधारी पक्षाला भरभरून मत दिली असली तरी त्यांना आजपर्यंत साधे जातीचे दाखले सुद्धा मिळालेले नसून त्यांच्यासाठी स्वतंत्र मोहीम राबवण्याची गरज आहे त्यांचा योग्य ते अभ्यास करून सदर छोट्या जातींना आरक्षण देण्यासाठी निधीमध्ये भरीव वाढ करून आरक्षणात वाढ करून नोकरी बाबतीत शैक्षणिक दृष्ट्या सामाजिक व राजकीय दृष्ट्या न्याय देण्यासाठी तातडीने त्यांना ग्रामपंचायत पासून ते लोकसभा पर्यंत राजकीय आरक्षण देण्याची मागणीही  प्रशांत बोरकर,प्रदेश खजिनदार अनिलकुमार  पालीवाल, जिल्हाध्यक्ष संजय चौधरी,जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश महाराज ठाकरे वसंत महाजन बापूसाहेब महाजन यांनी केली आहे.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)