![]() |
वरणगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई : दोन देशी पिस्तुलांसह एक जण अटकेत |
जळगाव, (अतिक खान)
जळगाव जिल्ह्यातील पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली, आगामी सण-उत्सव काळात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेऊन विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत वरणगाव पोलिसांनी प्रभावी कारवाई करत एका संशयिताला अटक करून त्याच्याकडून दोन देशी बनावटीच्या पिस्तुलांसह जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
प्राप्त माहितीनुसार, वरणगाव शहरात तिरंगा चौक परिसरात एक संशयित शस्त्रासह फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलिस उपनिरीक्षक अमरेंद्र यांच्या पथकाने सापळा रचला. या कारवाईत पोलिसांनी संजय गोपाल चांदणे (वय ४०, रा. दत्तनगर शिवार, ऑर्डनन्स फॅक्टरी, वरणगाव यास ताब्यात घेतले. तपासादरम्यान त्याच्याकडून दोन देशी पिस्तुले व दोन जिवंत काडतुसे असा मुद्देमाल मिळाला.
या प्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. २२३/२०२५, आर्म अॅक्ट ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीविरुद्ध पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, तसेच पोलीस उपनिरीक्षक अमरेंद्र पाटील यांच्या पथकाने केली. या पथकात पो.ना. विकास साताळे, पो.ना. श्रीकृष्ण सखाराम, पो.ना. प्रसांत पाटील, पो.ना. राहुल बनाबडे आणि पो.ना. भारत पाटील यांचा समावेश होता.
पोलिसांच्या या तात्काळ आणि अचूक कारवाईमुळे वरणगाव परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यास मदत झाली आहे.
जनसंपर्क अधिकारी जळगांव पोलीस