![]() |
मुक्ताईनगर नगरपंचायतीचे प्रभाग निहाय आरक्षण ईश्वर चिट्ठीने जाहीर |
संदीप जोगी मुक्ताईनगर.... आगामी होऊ घातलेल्या मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रभागातील १७ नगरसेवकांच्या जागासाठी बुधवारी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहामध्ये आरक्षण सोडत ईश्वर चिट्ठीने काढण्यात आले. त्यापैकी ९ जागा महिलासाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. भुसावळ प्रांत अधिकारी जितेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत हे आरक्षण सोडत काढण्यात आले. यावेळी व्यासपीठावर तहसीलदार गिरीश वखारे, मुख्याधिकारी सुभाष जानोरे , पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ उपस्थित होते.
प्रभाग आरक्षणामुळे अनेकांच्या राजकीय प्रवेशाच्या अशा पल्लवीत झाल्या आहेत. तर आरक्षणामुळे अनेकांच्या राजकीय स्वप्नांवर पाणी फेरले आहे. दरम्यान आज काढण्यात आलेल्या आरक्षणावर 13 तारखेपर्यंत हरकती घेता येणार आहे. आरक्षण सोडती प्रसंगी नाट्यगृहामध्ये दुपारी दोन वाजेपासून राजकीय पदाधिकारी कार्यकर्ते तसेच नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. गतवर्षी आरक्षण असलेल्या काही प्रभागांमध्ये बदल झाल्याने आता पुरुषांऐवजी त्यांच्या सौभाग्यवती किंवा आई यांना निवडणूक रिंगणात उतरण्याची संधी मिळणार असल्याचे दिसून येते.
प्रभागाचे आरक्षण पुढीलप्रमाणे: .......
प्रभाग 1- नागरिकांचा मागास प्रवर्ग
प्रभाग 2 - नागरिकांचा मागास प्रवर्ग
प्रभाग 3- सर्वसाधारण
प्रभाग 4 - सर्वसाधारण
प्रभाग 5 - सर्वसाधारण महिला
प्रभाग 6- अनुसूचित जाती महिला
प्रभाग 7 -अनुसूचित जमाती महिला
प्रभाग 8- अनुसूचित जाती
प्रभाग 9- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
प्रभाग 10- सर्वसाधारण महिला
प्रभाग 11- सर्वसाधारण
प्रभाग 12- नागरिकांचा मागास प्रवर्ग(महिला)
प्रभाग क्रमांक 13... सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक 14 .. सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक 15.. सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रमांक 16 ...नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
प्रभाग क्रमांक 17... सर्वसाधारण महिला