![]() |
विवरा येथील अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रत्यक्ष पाहणी करून चार दिवसांत नुकसान भरपाई द्या; अन्यथा तहसील कार्यालयात आमरण उपोषणाचा शिवसेना (उबाठा) चा इशारा |
मलकापुर:- तालुक्यातील विवरा येथे गत महिन्यात 16 सप्टेंबर 25 रोजी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे पालकमंत्री, आमदार,उपविभागीय अधिकारी, तहसीलदार मलकापूर यांनी प्रत्यक्ष येऊन पाहणी केली परंतु सरसकट मदत जाहीर केली शासनाच्या निकषाप्रमाणे खरडून गेलेल्या जमिनी 100% पिकाचे नुकसान तसेच विहिरीचे नुकसान आणि पुरामध्ये ठिबक सिंचन वाहून गेले याची कुठेही पाहणी न करता सरसकट मंजुराती दिली. आम्ही विवरा येथील जवळपास 200 शेतकऱ्यांनी वैयक्तिक नुकसानीचे अर्ज आज दि.09 ऑक्टोबर 25 रोजी तहसिलदार राहुल तायडे यांचेकडे दाखल कैले असून आमच्या शेताची प्रत्यक्ष पाहणी करून आम्हाला शासनाने दिलेल्या निकषानुसार आर्थिक मदत मिळावी चार दिवसात शेतांची पाहणी करून आम्हाला आर्थिक मदत न मिळाल्यास आम्ही शेतकऱ्यांसह, शिवसेना पदाधिकारी तहसीलदार यांच्या दालनातच लोकशाही मार्गाने आमरण उपोषण करू त्याची सर्व जबाबदारी शासनाची राहील असे निवेदनात नमूद केले आहे निवेदनावर शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर,विधानसभा संघटक राजेशसिंह राजपूत, शिवसेना शहर प्रमुख हरीदास गणबास, शिवसेना उपशहरप्रमुख शकील जमादार,वाहतूक सेना शहरप्रमुख इमरान लकी, विभाग प्रमुख चांद चव्हाण,घनश्याम चोपडे, शुभम पाटील, सुनील चोपडे,सोपान भोगे, दीपक कडू,प्रकाश भादलकर, प्रफुल्ल बऱ्हाटे सह शेतकऱ्यांची उपस्थिती होती.