![]() |
राज्य शिक्षक संघ, महाराष्ट्र च्या वतीने शनिवार रोजी “शिक्षक संवाद सभेचे” आयोजन |
मलकापुर:- राज्य शिक्षक संघाच्या अधिपत्याखाली “शिक्षक संवाद सभा” दि.11 ऑक्टोबर 25 शनिवार रोजी सायंकाळी 6 वाजता हॉटेल अमोल, बोडवड रोड, मलकापूर येथे आयोजित करण्यात आली आहे.
राज्य शिक्षक संघाचे अध्यक्ष दिलीप भिमरावजी कडू हे सभेचे संचालन करतील व शिक्षकांच्या विविध समस्या, आव्हाने व उपाय यावर सविस्तर चर्चा, मार्गदर्शन करतील. या कार्यक्रमात सर्व शिक्षक बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहणे अपेक्षित आहे.
सभेच्या समाप्तीनंतर स्नेहभोज सायंकाळी 7;30 वाजता आयोजित करण्यात आला आहे.
सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी या सभेत सहभागी होऊन संघटनेच्या उपक्रमांना पाठबळ देण्याचे आवाहन राज्य शिक्षक संघ, बुलढाणा जिल्हयाचे वतीने करण्यात आले आहे.