![]() |
पारपेठ भागातील गुलाब बाबा दर्गा परिसरातील रस्ता व नालीची दुरावस्था शिवसेना (उबाठा) ची ढापा व अर्धवट रस्ता पूर्ण करण्याची मागणी |
मलकापुर:- शहरातील पारपेठ भागातील गुलाब बाबा दर्गा समोरील नाजीर शाह शफुशाह यांच्या घरासमोर नाली व रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून दोन्ही बाजूंनी आलेल्या नाल्याच्या जोडणी रखडल्यामुळे पाणी रस्त्यावरून वाहत असून या दुर्गंधीमुळे रहिवासी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, रस्ता व नाली बनविणाऱ्या ठेकेदाराने बिल काढून अर्धवट काम सोडून पोबारा केला असल्याने आज याबाबत शिवसेना (उबाठा)पदाधिकाऱ्यांनी त्या अर्धवट कामाची पाहणी करून बांधकाम अभियंता धिरज ठोंबरे यांना दोन दिवसांत या ठिकाणच्या दोन्ही बाजूंच्या नालींची तात्काळ जोडणी करून अर्धवट रस्त्याचे काम पूर्ण करा अन्यथा न.प कार्यालयातच आमरण उपोषण करण्याचा इशारा भ्रमणध्वनी द्वारे शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर यांनी धिरज ठोंबरे यांना दिला आहे,यावेळी शिवसेना शहरप्रमुख हरिदास गणबास, वाहतूक सेना शहरप्रमुख इमरान लकी, अल्पसंख्यांक सेना उपजिल्हाप्रमुख सै. वसीम सै.रहीम, शिवसेना विभागप्रमुख सत्तार शाह, शेख मोहसीन शेख छोटू, साबीर खान आमीर खान,इरफान खान, इस्लाम खान, साबीर खान,मोहम्मद साबीर, शेख अक्रम, शेख असलम, सद्दाम खान, जमीर शेख, साबीर सय्यद, शेख अर्शद, शेख सलमान, शाहरुख खान, शेख अजीम सह आदिंची उपस्थिती होती