![]() |
केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपासह अन्य दोन पेट्रोल पंपावर दरोडा बंदुकीचा धाक दाखवत १ लाख ३५ हजाराचा मुद्देमाल लंपास |
संदीप जोगी मुक्ताईनगर....
मुक्ताईनगर शहरा जवळून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर असलेल्या रक्षा ऑटो फ्युएल्स या केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मालकीच्या पेट्रोल पंपावर गुरुवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास दुचाकी वर आलेल्या पाच दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवत दोन कर्मचाऱ्यांना मारहाण केली तसेच एक लाख रुपयांची रोकड लंपास केली. तसेच रात्री दहा ते अकरा वाजेच्या दरम्यान मुक्ताईनगर तालुक्यातील करकी फाट्याजवळील मनुभाई आशीर्वाद पेट्रोल पंप व वरणगाव शिवारातील तळवेल फाट्याजवळील सय्यद पेट्रोल पंपावर दरोडे करंडी दरोडा टाकलेला असून या प्रकरणी आरोपीला शोधात पथके रवाना करण्यात आलेली आहे.
मुक्ताईनगर येथील राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या रक्षा ऑटो फ्युएल्स हा केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मालकीचा पेट्रोल पंप आहे गुरुवारी रात्री 10:45 वाजेच्या सुमारास पेट्रोल पंपावर दोन मोटार सायकलवर आलेल्या पाच जणांनी अचानक पंपावर असलेल्या प्रकाश माळी व दीपक खोसे या दोघ कर्मचाऱ्यांना मारहाण केली कर्मचाऱ्यांचे डोक्याला बंदूक लावून गल्ल्यातील व कर्मचाऱ्यांकडे असलेल्या जवळपास एक लाख रुपयांची रोकड लंपास केले तसेच या पेट्रोल पंपावर असलेल्या कार्यालयातील कम्प्युटर प्रिंटर सीसीटीव्ही व विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणांची तोडफोड केली . सीसीटीव्ही डीव्हीआर देखील चोरून नेला.सदरील पेट्रोल पंप हा राष्ट्रीय महामार्ग 53 या या महामार्गाला लागून असल्याने रात्री उशिरापर्यंत या महामार्गावर दरोड्याची माहिती मिळताच नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली तोपर्यंत दरोडेखोर पसार झाले होते. दरोडेखोर बोहर्डीच्या दिशेने गेल्याची माहिती मिळताच त्या दिशेने पोलिसांनी पथके रवाना केलेली आहे.
घटनेची माहिती मिळताच मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे पोलीस स्टेशन निरीक्षक आशिष आडसूळ हे तात्काळ पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले होते.
मुक्ताईनगर येथील रक्षा ऑटो फ्युएल पेट्रोल पंप वरील दरोड्या नंतर दरोडेखोरांनी करकी फाट्यावरील
मनुभाई आशीर्वाद पेट्रोल पंप तसेच वरणगाव शहरातील तळवेल फाट्याजवळील सय्यद पेट्रोल पंपावर बंदुकीच्या धाक दाखवून दरोडा टाकला.
यामध्ये तिन्ही पेट्रोल पंपावरून दरोडेखोरांनी एक लाख 17 हजार पाचशे रुपये रोख, तीन मोबाईल एकूण किंमत अकरा हजार रुपये , साडेसहा हजार रुपये किमतीचे डीव्हीआर असा ऐकून एक लाख 35 हजाराचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे.
शुक्रवारी वरिष्ठ पोलीस अधिकारी मुक्ताईनगर येथे....... गुरुवारी रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या पेट्रोल पंपासह दोन पेट्रोल पंपावर दरोडा पडल्याची घटना असून शुक्रवारी जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, होम एस डी पी ओ अरुण आव्हाड, भुसावळ एसडीपीओ संदीप गावित, जळगाव गुप्तवार्ता विभागाचे पोलीस निरीक्षक प्रकाश वानखेडे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, मुक्ताईनगर चे पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ यांनी घटनास्थळी जात पाहणी केली. याप्रकरणी दिलीप खोसे राहणार पिंपरी अकाराऊत तालुका मुक्ताईनगर यांचे फिर्यादीवरून पोलिसात पाच अनोळखी इसमा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास पुढील निरीक्षक आशिष अडसूळ करीत आहे.
केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांची मालमत्ता सुरक्षित नाही तर सामान्य जनतेची मालमत्ता कशी सुरक्षित राहील तसेच जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था याचा बोजवारा वाजल्याचे विधान परिषदेचे आमदार एकनाथराव खडसे यांनी सांगितले.