जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2025 — आरक्षण प्रक्रियेचा पारदर्शक अंमल

Viral news live
By -
0
जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2025 — आरक्षण प्रक्रियेचा पारदर्शक अंमल
जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2025 — आरक्षण प्रक्रियेचा पारदर्शक अंमल

जळगाव जामोद (प्रतिनिधी) — जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर आज दिनांक 13 ऑक्टोबर रोजी स्थानिक तहसील कार्यालयात पंचायत समितीच्या आठ गणांसाठी आरक्षण प्रक्रिया पार पडली. ही प्रक्रिया उपविभागीय अधिकारी शैलेश काळे, तहसीलदार पवन पाटील, नायब तहसीलदार भरत किटे आणि निवडणूक लिपिक सत्यविजय जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.

आरक्षणाची चिठ्ठी काढण्याचा मान श्रीराज प्रवेश सातव या 10 वर्षीय बालकाला देण्यात आला. या वेळी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पंचायत समितीच्या आठ गणांचे आरक्षण खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे —

  • जामोद — सर्वसाधारण (महिला)
  • सुनगाव — सर्वसाधारण
  • खेर्डा बु. — अनुसूचित जाती
  • भेंडवळ बु. — नागरिकांचा मागास प्रवर्ग
  • आसलगाव — सर्वसाधारण
  • धानोरा — अनुसूचित जमाती (महिला)
  • पळशी सुपो — नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
  • पिंपळगाव काळे — सर्वसाधारण (महिला)

दरम्यान, याच दिवशी बुलढाणा येथे जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद गटांचे आरक्षण देखील पार पडले.

जळगाव जामोद पंचायत समितीच्या सभापतीपदासाठी सर्वसाधारण (महिला) हे आरक्षण निश्चित करण्यात आले असून तालुक्यातील चार गटांचे आरक्षण पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आले —

  • जामोद गट — अनुसूचित जमाती
  • खेर्डा गट — सर्वसाधारण
  • पिंपळगाव काळे गट — सर्वसाधारण
  • आसलगाव गट — अनुसूचित जमाती (महिला)

ही संपूर्ण प्रक्रिया शांततेत व पारदर्शक पद्धतीने पार पडल्याची माहिती तहसील प्रशासनाने दिली आहे.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)