मुक्ताईनगरमध्ये गुटख्याची अवैध विक्री – शाळकरी मुलांचे आरोग्य धोक्यात

Viral news live
By -
0

मुक्ताईनगरमध्ये गुटख्याची अवैध विक्री – शाळकरी मुलांचे आरोग्य धोक्यात

मुक्ताईनगरमध्ये गुटख्याची अवैध विक्री – शाळकरी मुलांचे आरोग्य धोक्यात

प्रतिनिधी : अतिक खान, मुक्ताईनगर

मुक्ताईनगर शहर तसेच परिसरात गुटख्याची अवैध विक्री मोठ्या प्रमाणावर सुरू असून त्यामुळे विशेषतः शाळकरी मुलांच्या आरोग्यावर गंभीर धोका निर्माण झाला आहे. सरकारने गुटखा विक्रीवर बंदी घातल्यानंतरही किरकोळ दुकाने, पानटपऱ्या व इतर ठिकाणी गुपचूप गुटखा विक्री सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन लहान वयातच मुलांना व्यसनाधीन करत असून त्यातून तोंडाचा कर्करोग, पचनसंस्थेचे विकार यांसारख्या गंभीर आजारांचा धोका निर्माण होत आहे. शाळकरी विद्यार्थी सहजपणे हे पदार्थ खरेदी करत असल्याचे चित्र दिसून येत असल्याने पालक व नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला याविषयी ठोस कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. शाळांमधूनही जनजागृती मोहीम राबवून विद्यार्थ्यांना व्यसनापासून दूर ठेवण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

नागरिकांची भूमिका :
"गुटखा विक्रीवर बंदी असतानाही जरासुद्धा शिथिलता न दाखवता पोलिस व प्रशासनाने कठोर कारवाई करावी."


एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Accept !