जळगावात ‘आमचा देवाभाऊ’ अभियानांतर्गत राख्यांचे संकलन गिरीषजी महाजन यांच्या हस्ते रक्षाताई खडसे यांच्याकडे सुपूर्द
By -
August 18, 2025
0
जळगाव – रक्षाबंधनाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेशतर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘आमचा देवाभाऊ’ या अभियानांतर्गत महिलांनी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी राज्यभरातून राख्या पाठवल्या आहेत. महिलांनी या राख्यांद्वारे आपल्या सुरक्षेची आणि सन्मानाची भावना व्यक्त केली आहे.
आज जळगाव येथे जिल्ह्यातील सर्व मंडळांमधून संकलित झालेल्या राख्या मंत्री श्री. गिरीषजी महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्याकडे सोपविण्यात आल्या. या राख्या पुढे भाजपा तर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत.
प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महिलांच्या सुरक्षेसह सर्वांगीण प्रगतीसाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. त्यामध्ये माझी कन्या भाग्यश्री योजना, नमो ड्रोन दीदी योजना, पंतप्रधान उज्ज्वला योजना, महिला सन्मान योजना, महिला उद्योगिनी योजना, बेबी केअर किट योजना, पंतप्रधान मातृ वंदना योजना, लाडकी बहीण योजना यांचा समावेश आहे. या योजनांमुळे महिलांच्या सुरक्षिततेसह आर्थिक, सामाजिक व आरोग्यविषयक उन्नतीस मोठा हातभार लागला आहे.
या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे, खासदार श्रीमती स्मिताताई वाघ, आमदार श्री. सुरेश (राजूमामा) भोळे, भाजपा जिल्हाध्यक्ष तसेच सर्व पदाधिकारी, मंडळ अध्यक्ष व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags: