श्रीक्षेत्र कोथळी-मुक्ताईनगर येथे तुळशीविवाह व रूक्मिणी स्वयंवर पारायण उत्सव ४ नोव्हेंबर रोजी

Viral news live
By -
0
श्रीक्षेत्र कोथळी-मुक्ताईनगर येथे तुळशीविवाह व रूक्मिणी स्वयंवर पारायण उत्सव ४ नोव्हेंबर रोजी


   संदीप जोगी...   मुक्ताईनगर  : ..........
श्रीसंत मुक्ताबाई समाधीस्थळ मुळमंदिर, श्रीक्षेत्र कोथळी-मुक्ताईनगर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही कार्तिक महिन्यातील मंगलमय तुळशीविवाह व रूक्मिणी स्वयंवर पारायणाचा सोहळा मोठ्या भक्तिभावात पार पडणार आहे. हा धार्मिक सोहळा मंगळवार, दि. ४ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आला आहे.

प्रबोधिनी एकादशीनंतर पारंपरिकरीत्या होणाऱ्या तुळशीविवाह उत्सवाने लग्नकार्याच्या हंगामाची सुरुवात होते. त्यानुसार, संत मुक्ताबाई अंतर्धान समाधीस्थळ (जुने मंदिर) येथे श्रीसंत एकनाथ महाराज लिखित ‘रूक्मिणी स्वयंवर’ ग्रंथाचे पारायण दुपारी १ ते ४ या वेळेत पार पडणार आहे. या पारायणात सहभागी होणाऱ्या उपवर मुला-मुलींना विवाहातील अडथळे दूर होतात, अशी श्रद्धा आहे.

ग्रंथ पारायणाचे नेतृत्व ह.भ.प. दुर्गाताई संतोष मराठे करणार असून, पारायणानंतर शुभ मुहूर्तावर तुळशीविवाह सोहळा आणि महाप्रसाद आयोजित करण्यात आला आहे.

या मंगलमय सोहळ्यास सर्व श्रद्धाळू, भक्तगण व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्रीसंत मुक्ताबाई संस्थान मुक्ताईनगर चे अध्यक्ष ॲड. रविंद्र पाटील, सोहळा प्रमुख व यजमान ह.भ.प. रविंद्र महाराज हरणे तसेच व्यवस्थापक उद्धव महाराज जुनारे यांनी केले आहे.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)