फिटनेस हा विकसित भारताचा मंत्र” डॉ. मनसुख मांडविया

Viral news live
By -
0
फिटनेस हा विकसित भारताचा मंत्र”  डॉ. मनसुख मांडविया

(अतिक खान मुक्ताईनगर)

राष्ट्रीय फिटनेस आणि वेलनेस संमेलन 2025 मध्ये रोहित शेट्टी, हरभजन सिंग आणि सायना नेहवाल यांचा Fit India Icons म्हणून गौरव

मुंबई, 2 नोव्हेंबर 2025  “फिटनेसचे महत्त्व आपण समजून घेतले नाही, तर 2047 पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विकसित भारताचे स्वप्न साकार होऊ शकणार नाही,” असे मत केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी व्यक्त केले. ते मुंबईतील ट्रायडंट हॉटेल येथे झालेल्या राष्ट्रीय फिटनेस आणि वेलनेस संमेलन 2025 मध्ये बोलत होते.

या संमेलनात बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी, क्रिकेट विश्वचषक विजेता हरभजन सिंग आणि ऑलिम्पिक पदक विजेती सायना नेहवाल यांचा Fit India Icons म्हणून सत्कार करण्यात आला. तसेच सायमी खेर, शिवोहम आणि वृंदा भट्ट यांनाही फिटनेस क्षेत्रातील योगदानासाठी केंद्रीय राज्य मंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

डॉ. मांडविया यांनी पुढे सांगितले, “पूर्वी लोक चालत, सायकलवर प्रवास करत असत — त्यामुळे फिटनेस आपोआप जपत होते. आज डिजिटल युगात हालचाली कमी झाल्या आहेत. हे बदलायला हवे. भारतातील 65% लोकसंख्या 35 वर्षांखालील आहे — जर ही पिढी फिट झाली, तर देशाची गती दुप्पट होईल.”

त्यांनी हेही अधोरेखित केले की फिटनेस हा फक्त आरोग्याशी संबंधित नसून, तो अर्थव्यवस्थेचा घटक बनू शकतो. “क्रीडा साहित्य, पोषणपूरक उत्पादने आणि फिटनेस उपकरणे भारतातच तयार झाली, तर आपण क्रीडा उद्योगात जगातील आघाडीचे राष्ट्र ठरू शकतो,” असे त्यांनी नमूद केले.

श्रीमती रक्षाताई खडसे म्हणाल्या, “फिटनेस ही राष्ट्रीय जबाबदारी आहे. ‘Sundays on Cycle’ सारखे उपक्रम छोट्या पातळीवर असले तरी त्याचे परिणाम मोठे असतात. भारताचा सर्वांगीण विकास हा शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीशी निगडित आहे.”

रोहित शेट्टी यांनी सोशल मीडियावरील ‘health influencers’ विषयी चिंता व्यक्त करत, “योग्य ज्ञानाशिवाय फिटनेस शिकवणे धोकादायक आहे. शरीर घडवणे हा दीर्घकालीन प्रवास आहे,” असा इशारा दिला.

सायना नेहवाल म्हणाल्या, “फिटनेस हा खेळाचा पाया आहे. चीन आणि जपानकडे बघा — त्यांचे यश फिटनेस संस्कृतीमुळेच आहे. पालकांनी मुलांना मोबाईलपासून दूर ठेवावे आणि त्यांचा शारीरिक विकास प्रोत्साहित करावा.”

हरभजन सिंग यांनी सांगितले, “भारतीय क्रिकेट संघात फिटनेसची जाणीव निर्माण करण्यात विराट कोहलीचा मोठा वाटा आहे. कौशल्यासोबतच फिटनेस हाच आज यशाचा खरा मंत्र आहे.”

या संमेलनातील पॅनेल चर्चांमध्ये तज्ज्ञांनी बालवयात फिटनेस संस्कृती रुजवण्यावर भर दिला. त्यांनी बनावट पूरक आहार, चुकीच्या सल्ल्यांपासून आणि जंक फूडच्या मोहापासून सावध राहण्याचे आवाहन केले.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)